Pages

Saturday, 5 July 2025

भाषा आमची लाडकी

षेवर प्रचंड प्रेम करा ती आईच आहे. 


आज एक कानपूर चे भाऊ भेटले मला म्हणाले प्रत्येक प्रांत असतो तिथे आपण काही काळ राहिल्यावर स्थानिक भाषा ही शिकलीच पाहिजे.

गंमत म्हणजे काही वेळ ते चांगल्या मराठीत बोलले नंतर मात्र मी म्हणाले मी सहसा लोकांना म्हणते तुम्हाला मराठी येते ना ते म्हणतात हिंदी बोला. पण माझे हिंदी हिंदी भाषिक मंडळींना कॉम्प्लेक्स होईल इतके उत्तम आहे 
आणि भाषा वेगवेळ्या शिकणे केवळ साहित्य आणि त्याचा आनंद घेण्यासाठी करता येईल.
कुठलीही भाषा शिका आणि शिकवण्या, कविता , साहित्य  निर्मिती , भाषांतर अशी कामे करा.

भाषेचा द्वेष नको. कारण मग आपण मराठीत हनुमान चालीसा कसा नाही याचा विचार करायला अवधी शिकून उत्तम मराठीत काव्य रूपात तो कसा करू शकू .

अधिक मराठी बोला आणि तसेच साहित्य लिहिणे वाचणे आवडत असेल तर त्यात इतकी उंची गाठा की आज मला भाऊ म्हणाला की तुम्ही लक्षात राहाल इतके चांगले हिंदी ऐकले नव्हते.

हो शिका आणि त्या भाषेची कामे मिळवा आणि पैसे कमवा. आपली भाषा सुध्दा वाचन वाढवून उत्तम होते.

माझी मातृभाषा कोकणी आहे. भाषा कोणतीही असो द्वेष करू नका.  कारण मराठी आपल्या संतांची आणि हिंदी ही
 राम कृष्णाची मातृ भाषा होतीच ना.

भाषा या बहिणी आहेत एवढेच की शाळेत मराठी अनिवार्य ठेवून . एक वेगळा विषय साहित्य समृद्धी असा ठेवावा. त्यात वेगवेगळ्या भाषा ठेवाव्यात आणि शाळेत नाटके नृत्य गायन यात त्याचा वापर व्हावा.

मुख्य म्हणजे दही हंडी साठी नवीन मराठी गाणी लिहावीत :) .   आणि मिरवणुकीला चांगली मराठी गाणी किंवा मांगल्य वाटू देणारी गाणी लावावीत.

No comments:

Post a Comment