Pages

Wednesday, 25 June 2025

आम्हा बोरकरांचे भाषा प्रेम:)


भाषा आणि तिची सक्ती असावी असे नाही पण आपण भाषे कडे या प्रांतात बोलली जाते म्हणून न पाहता रोटी चे साधन म्हणून पाहू शकतो.आपण क्रिकेट मध्ये करिअर करतो का ? पण खेळतो की नाही?
मात्र भाषा मराठी किंवा कुठली हे उत्तम आली तर ती काम देते सहावी किंवा सातवीतील मुलाची हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही भाषा चांगली असली तर निवेदन करणे भाषा शिकवून शिकवणी घेणे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही ती भाषा बोलणाऱ्या व्यक्ती पेक्षा उत्तम बोलून त्या व्यक्तीस विचार करायला लावणे की कमाल आहे बुवा या व्यक्ती ची मातृ भाषा नसूनही ही भाषा उत्तम कशी ? हे आणि असे परिणाम साधले जातात.
त्याच प्रमाणे साहित्य रचना करणे जसे पु. ल. देशपांडे  बाकीबाब बोरकर हे सुद्धा कोकणी असून सुध्दा  त्यांनी मराठीत रचना केल्या . हे असे सुद्धा होते. भाषा कुठल्याही समुदायाशी न जोडता स्वतंत्रपणे उत्तम साहित्य वाचण्या करिता शिकावी.
आपण सगळेच रोज हिंदी बोलतो.  ठरवून नाही पण बोलावेच लागते. मात्र सक्ती न करता पर्याय म्हणून ठेवली तर उत्तम शिकू बोलू.
कारण बोलणारा हा भाषा प्रेमी असला तरच उत्तम बोलेल.
आपल्याकडे मातृ भाषा कोकणी असून बरीच मंडळी तिचा त्याग करून मराठी बोलू लागले आणि त्यांना आई म्हणजे मातृभाषा शिकू आणि बोलू असे सुद्धा वाटत नाही. हे आपण आपल्या दृष्टीने केलेले एक अनुचित कृत्य आहे. 
पण आपण ह्यात बदल केला नाही तर महाराष्ट्र येथून कोकणी घेरा घरात न बोलली जाता पूर्ण पुसली जाईल अशी भीती वाटते कारण आकाशवाणी वर कोकणी विभाग स्वतंत्र पणे  चालत असे. हा असा दृष्टिकोन आपण ठेवून चालतो म्हणून तो आता पूर्वी च्या स्वरूपात दिसत नाही .
एखाद्या भाषेतली उच्चतम साहित्य कृती लिहिली जायला ती मातृभाषाच असायला हवी असे नाही. आपण भाषा शिकवून उत्तम भाषा विद्वान का निर्माण करू नयेत ? 
काही मंडळी धार्मिक ग्रंथाची भाषा मुद्दाम शिकतात आपण आजोबा बोलायचे म्हणून मातृ भाषा त्यागून राज्य भाषेला मातृभाषा मानले ना. आणि या नव्या भाषेला मातृ मानले.
मी मराठी हिंदी आणि इंग्लिश भाषा भाषेच्या प्रेमा पोटी उत्तम बोलू इच्छिते . माझी मातृभाषा कोंकणी आहे आणि तिच्या वर माझे अत्यंत प्रेम आहे.
माझे शिकण्याचं माध्यम हे इंग्लिश आणि हिंदी अनिवार्य असे होत. मराठी वाचन करून चांगले आहे.  शाळेत भाषा शिकणारी सगळीच मुले भाषा प्रेमी असतात असे नाही.
भाषा आणि साहित्य प्रेम असा विषय ठेवून मुलांना निवडा असे सांगता येईल. मराठी सक्तीची आणि इतर इच्छे नुसार निवडता येईल.
मला मराठी पाचवी ते सहावी होते. पण जे काही धड येते त्याला कारण आई वडिलांनी वाचणं लिहिणे बोलणे प्रेमाने शिकविले. मुख्य म्हणजे घरात शब्दकोश असला.पाहिजे हे सुद्धा लक्षात घेतले.
काल एक ऑटो वाला भेटला त्याला माझे बाबा कन्नड माध्यम चे असून त्यांनी काय केले हे सांगितले ज्यामु त्यांच्या भाषा उत्तम झाल्या .
हे असे आहे.