अमुचिया आई बाबां
ची मने
म्हणजे सुंदर उपवने
दिस येई जाई
करिता तयांची सुस्मरणे
एक झाली आज
दोन कुसुमे
आज च्या दिनी ती
कारवार आणि गोमंतक
सुखद मेळ
त्यांनी मांडिला
जीवन पट
जाहले सकळची
उत्कट अन सुवासिक
पाक कुशल माऊली
पुस्तकात डोकावतो नाथ
जरी दरवळे पक्वान्नाचा गंध
मान न वळे त्या दिशी कदापि
मग एकच ग्रास भरवी सखी सावली
त्यास पुसे ,"पदार्थ कसा झाला ? "
तो मंद हास्य विलसले मुखावरी ,
नाथ म्हणे, " बरवी भामिनी तुझी
कारागिरी ."
ऐशा सुखद स्मृती कितीक
हास्य फुलोरा वाणी प्रासादिक
संगीत शास्त्र चर्चा कितीक
याची करणांनी ऐकिल्या
चरित्र इतुके धवल
हंस ही लाजला क्षणभर
भल्या भल्या नी
टेकिला माथा
पित्या च्या चरणी
तशीच आमची जननी
उच्च असे विचार सरणी
सर्वदा म्हणे
अल्प झोळी ज्याची
तयासी पहावे
अनंतर त्या पाहोनी
स्वतः देवाप्रती
कृतज्ञ असावे
माझी झोळी भरली असे
तीस न्याहाळी
नाम घ्यावे निरंतर
पक्षी प्राणी फळा फुला
करी आदर
वाणी असावी मृदु
मन विसावू द्यावे
ईश चरणांवरी
निद्रा करीत असता.
११.१० रात्र
©️ नंदिनी प्रेमानंद बोरकर
२५/०६/२०२६
🌹
No comments:
Post a Comment